' मौजमजा करण्यासाठी औरंगाबादला जातायत ' : भाजपचे खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे; नाना पटोले

पुणे दिनांक १५ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) भंडारा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे म्हणाले की भाजपचे खायचे दात वेगळे व दाखवायचे असे म्हणत त्यांनी भाजपवर टिका केली आहे.यावेळी त्यांनी मराठ वाडा मध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर देखील म्हटले आहे की.' फाईव्ह स्टारचं कल्चर हे भाजपचे आहे.मराठवाड्याची पानं त्यांनी उलटून पाहावं.आज प्रर्यत औरंगाबाद येथे जी मंत्रीमंडळाची बैठक झाली ती रेस्ट हाऊस किंवा कमिश्नर ऑफिस मध्ये झाली आहे. पण यांची बैठक फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये होणार आहे. तुम्ही १० वर्ष सत्तेवर आहात केंद्रात व राज्यात तुमची सत्ता आहे.त्यामुळे तुम्ही काय केले.याचं हिशोब कधी द्या.काॅग्रेसने काय केलं हे राज्यातील जनतेला माहिती आहे.पण तुमची अवस्था फार वाईट आहे '
दरम्यान यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की.' मौजमजा करण्यासाठी औरंगाबादला जातायत 'त्यांना त्यांची मौजमजा भारी पडणार आहे.असे देखील नाना पटोले हे यावेळी म्हणाले आहेत.कंत्राटी भरती संदर्भात बोलताना ते म्हणाले ' आउट सोर्सिंगच्या माध्यमातून शासकीय पदे भरली जाणार आहेत.खरंतर जनतेची सेवा करण्याचे काम हे सरकारचं असतं.पण अशा प्रकारे कंत्राटी पद्धतीने कामगार भरती करुन जनतेची लूट करण्याचा प्रयत्न भाजपचे सरकार करीत असून आम्ही त्याचा निषेध करत आहोत.हे मराठवाड्याला काही देणार नाही.फक्त बोलायचं म्हणून बोलतील .आज महाराष्ट्रा समोर अनेक म्हत्वाचे प्रश्न आहेत आणि ते सोडविणे गरजेचे आहे.असे ते म्हणाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.