Bjp preparation to win the chinchwad by-election : 'चिंचवड'ची पोटनिवडणूक लाखाच्या फरकाने जिंकण्याची भाजपची तय्यारी

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने या मतदारसंघाची पोटनिवडणूक २६ फेब्रवारीला होत आहे. ती लाखाच्या फरकाने जिंकण्याचा निर्धार भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी काल शहर पक्षाच्या बैठकीत व्यक्त केला.
मागच्या वेळी २०१९ ला जगताप यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांचा ३८ हजार ४९८ मतांनी पराभव केला होता. यावेळी त्याच्या अडीचपट लीड नेण्याचा निश्चय भाजपने केला आहे. परंतू भावनेच्या लाटेतही तेवढे मताधिक्य मिळेल, अशी सद्यस्थिती नाही. हा जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असला, तरी पोटनिवडणुकीत होणारे कमी मतदान पाहता एवढ्या मोठ्या फरकाने विजय मिळण्याची शक्यता नाही.
मात्र, आ.जगतापांनी गेल्या १९ वर्षांत विकासगंगा शहरात आणल्याने त्यांच्या मतदारसंघात पुन्हा पक्षाचाच आमदार होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे आ.लांडगे यांनी चिंचवड तयारीच्या पक्ष कार्यालयातील बैठकीत सांगितले.
त्यासाठी चिंचवडच्या १३ प्रभागात मैदानावर उतरून काम करण्याचे आदेश सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांनी दिले. प्रत्येकजण आपल्या लक्ष्मणभाऊंचा विकासाचा वारसा जपण्यासाठी ही निवडणूक ताकदीने लढवणार आहे, असे ते म्हणाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.