Mumbai senate Election : मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीला एका रात्रीत अचानक तडका फडकी स्थगिती

पुणे दिनांक १८ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबई विद्यापीठाच्या जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणूका अचानक पणे एका रात्रीत तडका फडकी रद्द करण्यात आलेल्या आहेत.या निवडणूका बदल पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगितीचा निर्णय घेण्यात आला आहे.विध्यापीठाने घेतलेल्या या अचानक निर्णया मुळे आता या प्रकरणी तीव्र नाराजीचा सूर बघायला मिळत आहे.दरम्यान या प्रकरणी ९ ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाच्या वतीने सिनेट निवडणूका जाहीर करण्यात आल्या होत्या . आता अचानक पणे एका रात्रीत तडका फडकी या निवडणुका स्थगित केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.तर या बाबत बोलताना वरुण सरदेसाई यांनी म्हटले आहे की.हे सर्व बेकायदेशीर आहे व घाबरट पणांचे लक्षण आहे.
दरम्यान याप्रकरणी निवडणुकांमध्ये उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची आज १८ ऑगस्ट अशी अंतिम मुदत देण्यात आली होती.तर १३ सप्टेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात येणार होता.पण आता या निवडणुकांना अचानक पणे स्थगिती देण्यात आली आहे.या निवडणूकी साठी सर्व राजकीय पक्ष व विद्यार्थी संघटना यांनी जोरदार तयारी केली होती.पण आता निवडणुका स्थगित केल्यामुळे त्यांनी विद्यापीठाच्या या निर्णया बाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान याप्रकरणी या निवडणुका जाहीर करण्याऱ्या मुंबई विद्यापीठ व्यवस्थापन परिषद यांनी अचानक पणे निवडणूकांना स्थगिती का दिली.व या स्थगिती बाबत कारण मात्र अद्याप स्पष्ट केले नाही.या बाबतीत त्यांनी काढलेल्या परिपत्रकात कोणत्याही प्रकारचे ठोस कारण दिलेलं नाही.त्यामुळे या घेतलेल्या निर्णयावर विद्यार्थी संघटना व राजकीय संघटना या निर्णयामुळे प्रचंड प्रमाणात नाराज आहेत.व या निर्णयाबाबत जोरदार उलट सुलट चर्चा होत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.