Andheri by election : अंधेरी पोट निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना दोन्ही पक्ष लागले कामाला

अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी प्रचार यंत्रणा सुरू झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व भारतीय जनता पार्टी यांच्यात आता थेट सामना होत असून. दोन्ही पक्षांना ही पोट निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.
सदरची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटातील आमदार नेतेमंडळी नगरसेवक व कार्यकर्ते चांगलेच कामाला लागले आहेत. दोन्ही पक्षाच्या वतीने वार्ड स्तरीय बैठकांचे नियोजन चालू आहे. यासाठी भाजप पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली असून. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.
दरम्यान दुसरीकडे शिवसेना गटाचे उमेदवार साठी. उद्धव ठाकरे गटाचे नेते ऍड अनिल परब यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला व कार्यकर्त्यांना या निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके तर भाजप पक्षाचे मुरजी पटेल या दोघा उमेदवारात काट्याची लढत पाहण्यास मिळणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.