मराठा समाजाच्या आरक्षणात खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ : बीडयेथे मराठा समाज आक्रमक छगन भुजबळ.नारायण राणे.रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

पुणे दिनांक २२ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात सर्वत्र मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना अशावेळी मराठा समाजाला आरक्षण संदर्भात सहकार्य करण्याऐवजी आमच्याच समाजातील काही हितचिंतकांना व ओबीसी समाजाच्या नेतेमंडळी यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न व काम करीत आहेत.असा गंभीर आरोप करत संतप्त व आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या गावातील नागरिक व ग्रामस्थ यांनी छगन भुजबळ.नारायण राणे व रामदास कदम यांचे प्रतीत्तामक पुतळ्याला चप्पलांनी बडवत पुतळ्याचे दहन केल्याची घटना बीड तालुक्यातील सौंदाना येथे घडली आहे.
दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे.व आरक्षणासाठी अनेक मराठा समाजाचे तरुण पिढी निराशाजनक अवस्थेत आहे.तर काही मराठा समाजाच्या तरुणांनी आरक्षणासाठी आपली जीवनयात्रा संपवली आहे.व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात जीवांचे रान करत रात्रीचा दिवस स्वतः चे घर 🏠 सोडून फिरत आहेत.यातच आमच्या समाजातील काही अतिहुशार नेते मंडळी व स्वतःला ओबीसी समाजांचे जनक म्हणून घेणारे नेते मंडळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मदत करण्याऐवजी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला खोडा घालीत आहेत.आमच्या समाजानेच यांना मोठे केले ते आज मदत करण्याऐवजी मराठा समाजाच्या विरोधात राळ उठवत आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर गावातील सर्व ग्रामस्थ व महिला एकत्र येत छगन भुजबळ.नारायण राणे व रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चप्पलांनी बदडले व नंतर दहन केले.यावेळी ग्रामस्थांनी या नेत्यांच्या प्रति आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.