छगन भुजबळांच्या वादग्रस्त विधानामुळे दोन समाजात तेढ निर्माण होणार? : छगन भुजबळ दोन समाजात भांडण लावण्याचे काम करताहेत.सरकारने त्यांची मंत्रिपदावरून हक्कलपट्टी करावी छत्रपती संभाजीराजे यांची मागणी

पुणे दिनांक १७ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मंत्री छगन भुजबळ यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील ओबीसी समाजाच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावर आता महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापणार आहे? दरम्यान छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली असून भुजबळ हे स्वताःचे राजकीय स्थान टिकविण्यासाठी दोन समाजात भांडण लावण्याचे काम करत आहेत.असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान याप्रकरणी पुढे बोलताना ते म्हणाले की.भुजबळ राज्य सरकार मधील एक जबाबदार मंत्री आहेत.आणी ते अशी भूमिका घेत आहेत.याला आता हे राज्य सरकार जबाबदार आहे का.असा प्रश्नच संभाजीराजे यांनी केला आहे.त्यामुळे राज्य सरकारने भुजबळ यांची त्वरित मंत्री पदावरून हक्कलपट्टी करावी.अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.मंत्री छगन भुजबळ हे राज्यातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत.सर्व सामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसतांना केवळ आपले राजकीय स्थान टिकविण्यासाठी दोन समाजात नसलेली भांडण लावण्याचे पाप करत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.