महाराष्ट्रात सर्वत्र व्हायरल झाल्या नंतर भाजपने डिलिट केला व्हिडिओ : भाजपच्या ' त्या ' व्हिडिओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आली प्रतिक्रिया

पुणे दिनांक २७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) भाजपच्या महाराष्ट्राच्या अधिकृत टीव्हटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला होता.यात देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रांच्या नवनिर्मिती साठी मी ...' मी पुन्हा येईन ' असं म्हणतांना दिसत आहे.दरम्यान या व्हिडिओ मुळे पुन्हा आता राज्यात राजकीय भूकंप होईल का.? अशी शंका मोठ्या प्रमाणावर व्यक्त केल्या जात होत्या.त्यामुळे राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणावर उधाण आले होते. नंतर सदरचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या नंतर भाजपने सदरचा व्हिडिओ डिलिट केला आहे.
दरम्यान या सर्व घडामोडी बाबत महाराष्ट्रांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आली की मला ' त्या ' व्हिडिओ बाबत माहिती नाही.व मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही असं ते म्हणाले आहेत. दरम्यान तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्या नंतर भाजपने तो व्हिडिओ आता डिलिट केलेला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.