Politiks : मुख्यमंत्री यांचे हेलिकॉप्टर पाउस व धुक्यात भरकटले ,लॅडिग करण्यात अडथळा

पुणे दिनांक १० ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर भरकटल्यआचई अपडेट आताच हाती येत असून. पाऊस व धुक्यामुळे हे हेलिकॉप्टर दरे गावात उतरवणे शक्य झाले नाही.त्यामुळे मुख्यमंत्री यांना घेऊन ते पुन्हा. मुंबईच्या दिशेने जाण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली आहे.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवस त्यांच्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी जाणार आहेत.याचवेळी यादौऱ्यात अडथळा निर्माण झाल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.
दरम्यान सातारा जिल्ह्यातील दरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचचे मुळ गाव असून. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर दरे त्यांच्या मुळगावी जाणार आहेत.त्यांचा मुक्काम हा तीन दिवस दरे येथेच असणार आहे.ते या भागातील शेतकऱ्यांना भेटून बांबू लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी करणार आहेत.व काही शेतकऱ्यांच्या शेतावर ते स्वता बांबू लागवड करतील.अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.