Chief Minister's visit to Ayodhya : मुख्यमंत्री निघाले अयोध्या वारी वर

महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यापासून शिंदे नेहमीच वेग वेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय बनतात. कधी त्यांनी केलेल्या टिपण्या तर कधी फडणवीसांसोबत ची त्यांची मैत्री तर कधी त्यांची भाषणशैली..!
आता अश्यातच शिंदे साहेब अयोध्येच्या वारीवर निघाल्याच कळतंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार असे त्यांनी स्वतःच मंगळवारी नागपुरात सांगितले. मात्र, अयोध्या भेटीची तारीख त्यांनी स्पष्ट केली नाही.
उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात रामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, अयोध्येच्या महंतांनी सोमवारी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना अयोध्येत येऊन प्रभू रामांचे दर्शन घेण्याचे आवाहन केले तसेच शरयू नदीच्या तीरावर होणाऱ्या आरतीला येण्याचे देखील आवाहन केले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, "अयोध्या हा आमच्या श्रध्द्धेचा विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे.मी तिथे नक्कीच जाईन.तिथे गेल्यावर समाधानी वाटतं."
भारतीय जनता पक्षाबरोबर युती केल्यापासून श्रद्धेचे वारे अधिकाधिक वाहतांना दिसतंय.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.