CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नंदुरबार नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे आज लोकार्पण करण्यात आले

सर्वसामान्यांचे सरकार असल्याने नागरिकांच्या अपेक्षापूर्तीला प्राधान्य दिले आहे, नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावेळी दिली.
नंदुरबार नगरपरिषदेची नगरविकास विभागाकडे थकीत असलेली ७ कोटी २८ लाख रूपये देण्याची मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यावेळी केली असता मुख्यमंत्र्यांनी नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रक्कम परत देण्याचे तातडीने निर्देश दिले. अवघ्या १५ मिनिटात नंदुरबार नगरपरिषदेची थकीत रक्कम मंजूर केल्याची माहिती मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भाषणाच्यावेळी दिली.
पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.