निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिप्पणी! करणे केजरीवाल व प्रियांका गांधी यांना भोवले दोघांना निवडणूक आयोगाची नोटीस

पुणे दिनांक १४ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मंगळवारी आम आदमी पक्षाने सोशल मीडिया हॅंडल वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कथित अपमान स्पद टिप्पणी केली म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व काॅग्रेस पक्षांच्या नेत्या प्रियांका गांधी वाड्रा या दोघांना निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाने या दोघांना आदर्श आचार संहिताच्या उल्लंघन केल्याप्रकरणी आरोपाला उत्तर देण्यास सांगितले आहे.आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय संयोजकांना नोटीस बजावण्यात आली आहे.दिल्ली व पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राष्ट्रीय संयोजक आहेत. दरम्यान या संदर्भात भाजपने १० नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर 'अंत्यत अस्वीकार्य ''अनैतिक " व्हिडिओ क्लिप व टिप्पण्या पोस्ट केल्या बद्दल कारवाईची मागणी करण्यात आली होती. दरम्यान याप्रकरणी अरविंद केजरीवाल व प्रियांका गांधी वाड्रा या दोघांन विरुद्ध सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात 'अपमानस्पद टिप्पणी ' केल्याचा आरोप करण्यात आला आहे.आपने मागील आठवड्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ स्टोरी पोस्ट केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अदानी व मोदींचा फोटो पोस्ट केला व पंतप्रधान लोकांसाठी काम करत नसून उद्योगपतींसाठी काम करत असल्याचा आरोप केला होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.