Congress General Conference 2023 : काँग्रेस चे महाअधिवेशन यंदा रायपूरात

यंदा काँग्रेसचे ८५ वे अधिवेशन छत्तीसगडची राजधानी रायपूर मध्ये होणार आहे. काँग्रेसचे 3 दिवसीय अधिवेशन 24 फेब्रुवारीला सुरु होणार आहे. या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह देशभरातील काँग्रेस नेते सहभागी होणार आहेत.
काँग्रेस चे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, रायपूर मध्ये होणाऱ्या तीन दिवसीय अधिवेशन काळात पक्ष घटनेशी संबांधित काही अनिवार्य दुरुस्त्याही केल्या जातील.
यादरम्यान सध्याच्या राजकीय, आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. तसेच पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी नवीन विचारांवर चर्चा केली जाईल. काँग्रेस पक्षही आपली भावी रणनीती तयार करणार आहे. यासोबतच अनेक मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे या वर्षी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
काँग्रेस चे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, रायपूर मध्ये होणाऱ्या तीन दिवसीय अधिवेशन काळात पक्ष घटनेशी संबांधित काही अनिवार्य दुरुस्त्याही केल्या जातील.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.