Amit Shah : काँग्रेस हा राजे-राण्यांचा पक्ष - अमित शहा

काँग्रेस हा राजा-राण्यांचा पक्ष असल्याची टीका अमित शहा ( Amit Shah ) यांनी केली.
68 मतदारसंघ असलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात 12 तारखेला पार पडल्या. निवडणुकीत झालेल्या मतांची मोजणी ८ डिसेंबर रोजी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून भाजप आणि काँग्रेससह पक्ष हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सत्ता टिकवण्यासाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. असे असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथील निवडणूक प्रचारात सहभागी झाले होते. एका प्रचार सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, काँग्रेस पक्षातून मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्हाला कोणाचा मुलगा किंवा मुलगी व्हायचे आहे? काँग्रेस हा राजे-राण्यांचा पक्ष आहे.
हिमाचल प्रदेशात झालेल्या विकासकामांचा हिशेब भाजप देऊ शकतो, पण किती काळ राज्य केले याचा हिशेबही काँग्रेस देऊ शकत नाही, ( Amit Shah ) असे ते म्हणाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.