पाच राज्यांच्या होणाऱ्या विधानसभा बाबत रणनिती : देशातील काॅग्रेसचे नेते व कार्यकर्ते आज हैद्राबाद मध्ये एकत्र - जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे

पुणे दिनांक १६ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) देशातील सर्वच काॅग्रेस पक्षाचे नेते आज हैद्राबाद मध्ये एकत्र येणार आहेत.जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर ही प्रथमच त्यांच्या अध्यक्षते खाली काॅग्रेस कार्यकरणीची प्रथमच हैद्राबाद येथे दोन दिवसीय बैठक होत आहे.सदरच्या बैठकीत तेलंगणा सह पाच राज्यांच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुका व यावर रणनिती व केंद्रात होणाऱ्या लोकसभा निवडणुक बाबत जागावाटप यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान आज पासून दोन दिवसांची काॅग्रेस कार्यकरणी ची बैठक होत असून उद्या रविवार १७ सप्टेंबर रोजी काॅग्रेस पक्षाची मोठी रॅली काढण्यात येणार आहे.तसेच सदरच्या बैठकीत सोनिया गांधी यांच्या सह राहुल गांधी व प्रियंका गांधी देखील उपस्थित राहणार आहेत.व देश भरातून सर्व काॅग्रेस पक्षाचे नेते झाडून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.काही नेते मंडळी हैद्राबाद येथे दाखल झाले आहेत.या बैठकीत अनेक मुद्द्यांवर वर चर्चा होणार आहे.आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका व पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका व याकरिता स्थापन करण्यात आलेल्या महाआघाडी वर चर्चा.याच बरोबर महागाई.बेरोजगारी . मणिपूर हिंसाचार.व जम्मू काश्मीर सद्य स्थिती बद्दल या बैठकीत चर्चा होणार असून सरकारला कसे कोंडीत पकडण्याबाबत रणनीती ठरविण्यात येणार आहे.व तसेच विरोधकांच्या इंडिया आघाडीची एकजूट पुढे नेण्यासाठी व २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक बाबत पुढील रणनीती व निवडणूक बाबत तयारी यावर खलबतं होणार आहे.या बैठकीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे.सोनिया गांधी.राहुल गांधी.प्रिंयका गांधी.मनमोहन सिंग . सचिन पायलट शशी थरूर.नेते उपोस्थित रहाणार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.