Controversy between Urfi Javed-Chitra Wagh : उर्फी जावेदवरुण चित्र वाघ आणि रूपाली चाकणकर यांच्यात वाद

  • संपादक : पोलखोलनामा टीम
  • 05 Jan 2023 12:13:16 PM IST
controversy between Urfi Javed-Chitra Wagh

सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय असणारी उर्फी जावेदची वेशभूषा आता महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा बनलीये. उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ सातत्यानं टीका करताहेत. तर त्यावर उर्फी जावेदकडून प्रत्युत्तर दिलं जातंय. उर्फी जावेद-चित्रा वाघांचा वाद आता राज्याच्या महिला आयोगापर्यंत जाऊन पोहोचलाय. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर चित्रा वाघांनी निशाणा साधलाय.

उर्फी जावेदच्या फॅशनची आणि बोल्ड फोटोंची चर्चा सोशल मीडियावर नेहमीचीच झालीये. पण, भाजपच्या नेत्या चित्रा वाघांनी उर्फीच्या बोल्डनेसवरच बोट ठेवलंय. चित्रा वाघांनी उर्फीच्या वेशभूषेला नंगटपणा म्हणत अटकेची मागणी केली. यावरून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधला. सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिल्यानंतर चित्रा वाघांनी आता राज्य महिला आयोगाला सवाल केलेत.

चित्रा वाघांचे राज्य महिला आयोगाला सवाल
चित्रा वाघांनी ट्विट केलंय. त्या म्हणतात, "भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का?", असा प्रश्न चित्रा वाघांनी विचारला आहे.

चित्रा वाघ यांनी कुठेही रुपाली चाकणकर यांचं नाव घेतलेलं नसलं, तरी त्यांच्या रडारवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर असल्याची चर्चा आहे. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रुपाली चाकणकरांकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. उर्फीच्या वादामुळे राष्ट्रवादीच्या आजी-माजी महिला नेत्या समोरासमोर आल्या आहेत.


तर रुपाली चाकणकर म्हणाल्या

कोणी काय कपडे परिधान करावेत हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव ठरावीक व्यक्तींना अश्लील वाटत असेल पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही.

प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. म्हणूनच शेवटी कोणी काय कपडे घालावेत हा ज्याचं त्यानं ठरवायला हवं. त्यातूनही कोणी काय कपडे घातले, याचा इतिहास काढला तर फार मोठी यादी समोर येईल. त्यावर त्यांना ही उत्तरं द्यावी लागतील. तेव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं, असं मतही रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं.

चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर टीका केली होती. उर्फीनं तोकड्या कपड्यात सार्वजनिक ठिकाणी फिरणं योग्य नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हंटलं होतं. त्यावर रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर दिलंय.

उर्फीच्या बोल्ड कपड्यांविरोधात चित्रा वाघ यांनी आवाज उठवला. त्यांनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. न्युडीटी पसरविल्याबद्दल अटक करण्याची मागणीही केली. त्यानंतर त्या दोघींचं ट्वीटरवार चांगलंच रंगलंय.

 

संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.

controversy between Urfi Javed-Chitra Wagh Maharashtra Politics News
Find Maharashtra News, controversy between Urfi Javed-Chitra Wagh News, Maharashtra Politics News, latest Maharashtra marathi news and Headlines based from Maharashtra City. Latest news belongs to Maharashtra crime news, Maharashtra politics news, Maharashtra business news, Maharashtra live news and more at Polkholnama.

इतर संबंधित बातम्या

इतर राजकारण बातम्या

डाउनलोड पोलखोलनामा अँड्रॉइड अँप

Google Play Store

ताज्या बातम्या

Rajesh deshmukh : विधानसभा पोटनिवडणूकीत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन
Chandrakant patil : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते टेरेस गार्डनचे उद्घाटन
Art of Living : आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra concluded by hoisting the Tricolor at Lal Chowk : लाल चौकात तिरंगा फडकावून राहुल गांधीच्या 'भारत जोडो यात्रे'चा समारोप
Pathan Box Office- Day 4 : पठाण बॉक्स ऑफिस दिवस 4 कलेक्शन: शाहरुख खानच्या चित्रपटाने जगभरात ₹429 कोटी कमावले; भारतात सर्वात जलद ₹250 कोटी
Police Raid Gambling : जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला, १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Accident : कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात
New Social Media Rules : नवे सोशल मीडिया नियम, मार्चपासून होणार लागू

शहरातील बातम्या