Death threat to BJP leader Ashish Shelar : भाजपचे नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळं एकच खळबळ उडाली आहे. एका निनावी पत्राद्वारे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. शेलारांच्या कार्यालयात हे पत्र आलं होतं.
आशिष शेलार यांच्या मुंबई कार्यालयात शुक्रवारी सकाळी एक निनावी पत्र आलं, या पत्रातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हातानं लिहिलेलं हे पत्र असून या पत्रात आशिष शेलारांसह भाजपविषयी अपशब्द वापरण्यात आले आहेत. या पत्रात आक्षेपार्ह भाषेत काही मजकूर लिहिलेला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे.
हे पत्र मिळाल्यानंतर शेलारांच्या कार्यलायातील कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून यासंबंधी कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंबंधी तक्रारही दाखल करण्यात आली आहे, त्यामुळं या प्रकरणी एफआयर दाखल होण्याची शक्यता आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.