राजकारणातील मोठी घडामोड व्यापामुळे दिल्याचे स्पष्ट : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला पुणे जिल्हा बँकेचा संचालकपदाचा राजीनामा

पुणे दिनांक १० ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील राजकारणात एक मोठी घडामोड झाल्याची माहिती मिळत असून राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रीमंत्रीपदाच्या वाढत्याव्यापामुळे अजित पवार यंनी हा राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण दिले जात आहे.
दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी की राज्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदाचा आज राजीनामा दिला आहे गेली ३२ वर्षे अजित पवार हे जिल्हा बँकेवर प्रतिनिधित्व करत होते.बऱ्याच वेळा त्यांनी अध्यक्ष पदाच्या धुरा समर्थपणे सांभाळली होती.त्यांच्या मार्गदर्शनाखाली खाली बॅकेने मोठी आर्थिक प्रगती केली होती.दरम्यान १९९१ साली ते बॅकेचे संचालक झाले.त्यावेळेस बॅकेचा व्यावसाय हा ५५८ कोटी रुपये होता पण तोच व्यावसाय २०७१४ कोटी रुपायांन प्रर्यत नेला आहे. दरम्यान या आता रिक्त झालेल्या जागेवर ते कोणाला संधी देतात याकडे पुणे जिल्ह्यातील अनेकांचे लक्ष लागले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.