इतर राज्यांतील बियर धोरणांचा तपास करणार ही समिती : मनसोक्त प्या बियर व करा सरकारला चिअर! बियर विक्रीत घट बियर विक्री वाढवण्यासाठी सरकारने नेमली पाच सनदी अधिकांऱ्याची समिती

पुणे दिनांक २३ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यातील बियर विक्री मध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अबकारी करातून कमी महसूल मिळत आहे.त्यामुळे यावर महाराष्ट्र सरकारने एक पाच जणांची समिती नेमली आहे.ही समिती इतर राज्यांच्या बियर धोरणांचा अभ्यास करणार आहे.आणी यांचा रिपोर्ट सादर करणार आहे.तसेच राज्य सरकार आता अबकारी करात कपात करण्यांचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.यामुळेतरी बियर विक्री मध्ये वाढ होऊन राज्य सरकारच्या तिजोरीत अबकारी कर रुपाने वाढ व्होईल अशी राज्य सरकारची एकंदरीत धारणा दिसत आहे.याचा अर्थ असा की आता राज्यातील तरुणांनी मनसोक्त बियर पेऊन राज्य सरकारला करा चियर यांचा अर्थ असाच निघतो आहे.
दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्य असलेले हे अधिकारी हे इतर राज्यांतील बियर धोरणांचे परिक्षण करण्याचे काम देण्यात आले आहे.ही समिती आता एक महिन्याच्या आत आपला हा अहवाल राज्य सरकारला सादर करेल.तसेच बियरच्या अबकारी महसूलात वाढ करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने अबकारी करात सूट देण्याचा विचार करत आहे.त्यामुळे तरी बियर पाण्याकडे पाठ फिरवणारी तरुणांयी याकडे आकर्षित व्होईल यांची एक प्रकारे सरकार प्रयत्नशील आहे.असे सरकारच्या या धोरणामुळे एकंदरीत दिसत आहे.तर काय मनसोक्त प्या बियर व सरकारला करा चियर असे सरकारच्या धोरणाला म्हटले तर वावगे ठरणार नाही.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.