महाराष्ट्रात दुष्काळाचा हाहाकार शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही : राज्यात दुष्काळाच्या झळा आणि सर्वपक्षीय१२ आमदार निघाले लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर!

पुणे दिनांक १८नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात बीड जिल्ह्यात शेतकरी पाण्यासाठी वणवण करत आहे.आजच बीडच्या जिल्हाधिकारी यांनी बीड मधील ११ गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे म्हणून त्या गावात दुष्काळ जाहीर केला आहे व आमचेच राज्यकर्ते सर्व पक्षीय १२ आमदार हे लवकरच लंडनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दरम्यान या पाच दिवसांच्या दौऱ्यात हे १२ आमदार महाशय ब्रिटन येथील सुशासन व सार्वजनिक धोरणांचा अभ्यास करणार आहेत दरम्यान महाराष्ट्रातील विधानसभा व विधानपरिषद व बाहेर देखील एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतात व ब्रिटन दौऱ्यात मात्र सुशासनाचा अभ्यास करणार आहेत.व ब्रिटन मध्ये ' तुझा गळा माझा गळा ' असे म्हणत फिरणार आहेत . संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचा हाहाकार उडाला असतांना लवकरच या १२ आमदार याचं मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन यांचे विमान लंडन च्या दिशेने मात्र लॅंडिंग होणार हे निश्चित.
दरम्यान लंडन येथे अभ्यास दौऱ्यावर जाणाऱ्या आमदांरा मध्ये भाजप, शिवसेना (उध्वव बाळासाहेब ठाकरे गट) व काॅग्रेस , समाजवादी पक्ष.याच बरोबर अपक्ष आमदार यांचा समावेश आहे.दरम्यान यात भाजप पक्षाचे अमित साटम.मिहिर कोटींचा, जयकुमार रावल.मंगेश चव्हाण. पंकज भोयर.या आमदारांचा समावेश आहे.तर (उध्वव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तर काॅग्रेस अमीन पटेल, झिशान सिद्दीकी. अमित झनक,अस्लम शेख,या आमदारांचा समावेश आहे. तर समाजवादी पक्षाचे रईस शेख.व अपक्ष आमदार सत्यजित तांबे या आमदारांचा समावेश आहे.२० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर असा पाच दिवसांचा दौरा असणार आहे. ब्रिटन मधील वर्ल्ड स्क्रीनिटी सेट डेव्हिड या विध्यापींठा मध्ये सुशासन व सार्वजनिक धोरणांचा अभ्यास करण्या साठी या १२ आमदारांचा हा लंडन अभ्यास दौरा असणार आहे.दरम्यान महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांत लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. शेतकरी यांच्या जनवांराच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे.त्यासाठी जनवांराच्या चारा छावण्या उभारण्यांची मोठी गरज आहे.अनेक शेतकऱ्यांना पिकांच्या विम्याचे पैसे मिळाले नाही.तर कापसाला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.उसाला बाजार भाव साखर कारखाना वाढवून देत नाही.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे.तसेच आवकही पाऊसात कांदा शेतकरी वर्गाचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्याचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत बीड.जालना अहमदनगर जिल्ह्यात तसेच अन्य जिल्ह्यांत पाण्यात हाहाकार उडाला आहे.शेतकरी वर्गाला टॅकर मिळत नाही.पाण्यामुळे शेतकरी वर्गाच्या खरीपाचे तीन तेरा नऊ... वाजल्या आहेत.हे सर्व गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.मराठा आरक्षण व धनगर आरक्षण संपूर्ण महाराष्ट्रात पेटले आहे.एक नाही अनेक प्रश्न असताना अशी सरकारी उधळपट्टी कितपत योग्य आहे. असा सवाल आता संपूर्ण महाराष्ट्रातून आमदारांच्या लंडन दौऱ्यावरुन आता मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.