ED Raids in Pimpri : पिंपरीत 'ईडी' चा छापा, सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षांच्या घरावर छापा

पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने छापा टाकला. बनावट कागदपत्रे वापरून, कर्जवाटपचा चारशे कोटीपेंक्षा अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. याच प्रकरणी मुलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी मुलचंदानी हे जामीनावर बाहेर आले होते. आता पुन्हा ईडीने छापा टाकल्यामुळे चर्चांना उधान आल आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये ईडीने छापा टाकल्यामुळे एकच खळबळ उडाली. मुलचंदानी यांच्या घरात ईडीचे पथक ठाण मांडून आहे. पिंपरीतल्या मिस्ट्री पॅलेस या इमारतीत मुलचंदानी राहतात. याच ठिकाणी ईडी कसून तपासणी करत आहे. इमारतीखाली पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणेचे जवान तैनात आहेत . कोणालाही या इमारतीत प्रवेश करू दिला जात नाहीये.
सेवा विकास बँकेत अनेक महिन्यांपासून घोटाळा होत असल्याचे बोलले जात होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या तपासात १२४ कर्जाची अशी प्रकरणे समोर आले होते, ज्यामध्ये बनावट कागदपत्रे घेऊन जवळपास चारशे कोटींपेक्षा अधिक कर्जवाटप करण्यात आले होते. या प्रकरणात मुलचंदानी यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांना अटक झाली होती..
मुलचंदानी हेल सद्या जामीनावर बाहेर आहेत. ईडीच्या या कारवाईकडे बँकेच्या हजारो ठेवीदारांकडे लक्ष आहे. त्यांना एक दिलासा मिळेल, अशी आशा ठेवीदारांना आहे. यामुळे आता या कारवाईत पुढे काय होणार, याकडे ठेवीदार अपेक्षा ठेवून आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.