सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ११ नेत्यांच्या पुतळ्याचे केले दहन

पुणे दिनांक २४ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेली ४० दिवसांची मुदत आज संपली असून उद्या पासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.दरम्यान दोनच दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना मंत्र्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार मराठा समाजाच्या तरुणांनी मंत्र्यांना व आमदार व खासदार यांना गावबंदी केली आहे. व तसे गावदवंडी देऊन बंदी घातली आहे व गाववेशीवर तसे मोठे होर्डिंग्ज लावले आहेत.
दरम्यान सोलापूर मधील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून ५०/ टक्केच्या आत आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.मराठा समाजाला लवकारा लवकर आरक्षण न दिल्यास सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांना राज्यात फिरु दिले जाणार आहे.त्याच बरोबर मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करु नये. व अन्यायाविरुद्ध लढण्याचे आवाहन आंदोलनकर्ते करत आहे. आज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज दसऱ्याला रावणरुपी ११ सर्वपक्षीय नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे.सोलापूर येथील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार.मंत्री.छगन भुजबळ मंत्री चंद्रकांत पाटील.विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.खासदार संजय राऊत.व वकील गुणरत्न सदावर्ते.अशा एकूण ११ नेत्यांचे फोटो लावलेल्या रावणरुपी पुतळ्याचे दहन केले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.