PM Modi : गोव्याचे काँग्रेसचे आठ बंडखोर आमदार आज घेणार नरेंद्र मोदींची भेट

गोव्याचे काँग्रेसचे आठ बंडखोर आमदार आज सोमवारी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. अशी माहिती पक्षाच्या एक वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे त्यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळीच पंतप्रधानांची भेट होणार आहे.
भाजप पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सूत्राच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार यातील काही आमदार रविवारीच सहा काँग्रेसचे बंडखोर आमदार रात्रीच विमानाने गेले असून यातील अन्य दोन आमदार सध्या राज्याबाहेर असल्यामुळे ते नंतर दिल्लीत पोहोचतील. हा काँग्रेसचा बंडखोर आमदारांचा गट हा दिल्ली दौऱ्यात भाजपाचे पक्षाध्यक्ष जे पी नड्डा व गुहमंत्री अमित शहा यांची देखील भेट घेण्याची शक्यता आहे. या वर्षी झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप पुन्हा सत्तेत आला होता. चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत त्यांचे 20 आमदार होते, तर नुकत्याच झालेल्या पक्षांतरानंतर काँग्रेसचे संख्याबळ 11 वरून तीनवर आले आहे.
एकीकडे काँग्रेस पक्ष भारत जोडी यात्रा करत असताना गोव्यातून काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या 11 पैकी 8 आमदारांनी काँग्रेस सोडली. या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री आणि मडगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत, कळंगुट मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार मायकल लोबो, त्यांच्या पत्नी आणि अंजुना मतदारसंघातील आमदार डिलैला लोबो, आमदार केदार नाईक आणि राजेश फळदेसाई हे भाजपशी संबंधित आमदार आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.