Sanjay Raut : शिवसेनेचे "धनुष्यबाण" हे चिन्ह गोठविले तरी नवीन चिन्ह देखील क्रांती घडवेल! संजय राऊत

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह "धनुष्यबाण" हे निवडणूक आयोगाने गोठवले असले तरी उद्धव ठाकरे यांनी प्रर्यायी चिन्हाची घोषणा केली. त्यावर प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवली असली तरी नवीन चिन्ह देखील क्रांती घडवेल.
शिवसेना व उद्धव ठाकरे गटासमोर एका मागून एक संकटाची मालिका सुरूच आहे. तर शिवसेनेची मुलुख तोफ असणारे संजय राऊत यांची अनुपस्थिती आता सर्वच शिवसैनिकांना प्रकाश आणि जाणवत आहे. या सर्व प्रकरणावर त्यांनी आपली बोलकी प्रतिक्रिया दिली आहे की. शिवसेनेचे नवीन चिन्ह नक्कीच क्रांती घडवून आणेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आज त्यांना सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. यावेळी त्यांनी न्यायालयाच्या आवारात माध्यमाचे प्रतिनिधी व शिवसैनिक यांच्याबरोबर संवाद साधला. ते पुढे म्हणाले भविष्यात आम्ही अधिक सक्षम होऊ आमच्यात व सर्व शिवसैनिकात ( स्पिरीट) आहे. असेही ते म्हणाले खरी शिवसेना कोणाची आहे. हे सर्व तमाम शिवसैनिकांना माहित आहे चिन्ह बदलले तरी सर्व लोक आमच्याशी जोडले जातील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात आणले होते. त्यावर आज न्यायालयात कामकाज होऊन त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी ही 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.