MNS Leader Sandeep Deshpande : मनसेचे नेते संदीप देशपांडेंचं खळबळजनक वक्तव्य

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आपण कार्यालयात नसताना एक व्यक्ती कागदपत्र आणि पेन ड्राईव्ह ठेवून गेल्याचा माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. या पेन ड्राईव्हमध्ये कोरोना काळात मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्यांचे पुरावे असल्याचा दावा देशपांडे यांनी केला आहे. हे सगळं सोमवारी जाहीर करणार असल्याचं संदीप देशपांडेंनी सांगितलं. त्याचप्रमाणे, मुंबईकरांची लूट कोणी आणि कशी केली याची माहिती तसेच बँक खात्यांचे पुरावेही असल्याचं देशपांडे यांनी म्हटलं आहे.
कोरोनाच्या काळात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे असल्याचा पेन ड्राईव्ह हाती लागल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं. हे सगळं जाहीर करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या पेन ड्राईव्हमध्ये बँक खात्यांचे पुरावे देखील असल्याचं त्यांनी सांगितलं. कशा पद्धतीने मुंबईची लूट करण्यात आली हे उघड करणार आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात Anti Corruption Bureau (ACB) कडे करणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.