महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल भाजपकडून व्हिडिओ शेअर : फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? भाजपचे अधिकृत ट्विटरवरुन मी पुन्हा येईलच्या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

पुणे दिनांक २७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) ' महाराष्ट्राच्या नव निर्मितीसाठी मी पुन्हा येईल ', अशा आशयाच्या भाजप पक्षाच्या महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटरवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ भाजपकडून शेअर करण्यांत आला आहे.त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री पदांवर विराजमान असलेले देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार का.या चर्चांना उधाण आले आहे.त्यामुळे भाजपच्या या व्हिडिओ मुळे राज्यात दावे व प्रतिदाव्यांचा सिल सिला सुरू झाला आहे.
दरम्यान राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे.यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे.एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं.तर त्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं पण एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली व चर्चांना एकदाच पूर्णविराम लागला व आता काही वर्षांनंतर पुन्हा एकदा या चर्चा आता नव्याने सुरू झाल्या आहेत.दरम्यान भाजप पक्षाच्या या ट्विटरवर शेअर केलेल्या याव्हिडिओवर बोलताना उध्वव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.' फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पुन्हा कधीही येऊ शकणार नाही व संपूर्ण भाजपाला सध्या फडणवीसांच्या हो ला हो करावं लागेल त्यामुळे ते असं काहीतरी करतात ', असे म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.दरम्यान या शेअर केलेल्या या व्हिडिओ मुळे सर्वच आमदारांमध्ये चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.व भाजप पक्षांचे नेते व पदाधिकारी जपून माध्यमांना मुलाखत देत आहे.याबाबत सर्वच माध्यमातून देखील या बाबत चर्चा सुरू आहे.या व्हिडिओ मुळे महाराष्ट्रांचे राजकरण ढवळून निघाले आहे.हे मात्र खरं
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.