Politiks : पवार काका-पुतण्यांच्या पुण्यातील भेटीनंतर फडणवीसांची प्रथम प्रतिक्रिया

पुणे दिनांक १३ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार या काका पुतण्याची पुण्यात झालेल्या गुप्त भेटीवरून राजकीय क्षेत्रात अनेक चर्चांना उधाण आले आहे.आता याच मुद्यावरुन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही देखील प्रतिक्रिया आली आहे.अजित पवार - शरद पवार या दोंघांच्या पुण्यातील भेटीबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याल्याकडे नसल्याचं फडणवीस यांनी म्हटले आहे.ते आज ते चिखलठाणा येथे माध्यमाणा प्रतिक्रिया देताना बोलत होते.
दरम्यान याप्रकरणी बोलताना ते म्हणाले की." अजित पवार व शरद पवार यांच्या पुण्यातील भेटीबद्दल मला काहीही माहिती नाही.व यांचा कोणताही तपशील आपल्या कडे नाही.व भेट झाली नाही झाली किंवा किती वेळ झाली या संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती माझ्याकडे नाही," असे फडणवीस हे म्णाहणाले आहे.नंतर माध्यमाच्या प्रतिनिधींनी मंत्री मंडळ विस्तारा बाबत त्यांना विचारले असता.ते म्हणाले मला माहिती नाही.जर असेल तर नक्की कळवतो असे ते म्हणाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.