Politiks : शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर भाजप मध्ये जाणार? महाराष्ट्रा मधील मोठ्या नेत्यांची ऑफर

पुणे दिनांक ४ ऑगस्ट ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) राजकीय पटलावरून आता नविन अपदेट येत असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर हे संघटने मध्ये नाराज असल्याचे समजत असून त्यांनी कार्यकर्तेंन बरोबर बुलढाणा येथे बैठक घेऊन आपली खदखद त्यांनी व्यक्त केली. आता भाजप कडून त्यांना ऑफर देण्यात आली आहे. आणी ही ऑफर महाराष्ट्रातील भाजपचे राज्य ओबीसी सेलचे समन्वयक डाॅ. आशिष देशमुख यांनी दिली आहे.
दरम्यान शेतकरी संघटनेत बहुजन समाजाच्या नेत्यांनवर अन्याय होत आहे. अशी खदखद तुपकर यांनी बुलढाणा येथील स्वाभिमानी पक्षाच्या कार्यकर्तेंन बरोबर असलेल्या बैठकीत त्यांनी दोन दिवसापूर्वी केली होती. यावर काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या बाबत म्हणाले पेल्यातील वादळ असून यात मार्ग काढू म्हणाले होते. पंरतु आता यात पुन्हा नवीन अपदेट पुढे येत आहे. भाजपचे डाॅ. आशिष देशमुख यांनी तुपकर यांना खुली ऑफर देत म्हणाले की तुम्ही पक्ष संघटनेत दावा करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप मध्ये या आम्ही तुमचे स्वागत करायला तयार आहोत. अशी खुली ऑफरच आशिष देशमुख यांनी तुपकर यांना दिली आहे. त्यामुळे आता शेतकरी संघटनेत खळबळ उडाली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.