Bharatiya janata laundry : आधी भाजप पक्ष आता त्याची झाली या भारतीय जनता लॉन्ड्री... सुप्रिया सुळे यांचा सणसणीत टोला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा नव्याने एकदा भाजप पक्षावर जोरदार प्रहार केला असून भाजपाच्या नेत्याकडे आता बोलण्यासाठी काहीच उरले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे आता दडपशाही सुरू असल्याचा प्रहार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. ज्येष्ठ नेते पवारांवर हल्ला केल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नाही. अशेही त्या म्हणाल्या याआधी भाजप पक्ष होता पण आता मात्र त्याची भारतीय जनता लॉन्ड्री झाल्याचा सणसणीत टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान भाजप पक्षाला चांगले दिवस आणणारे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आज कुठे आहेत. असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर जबरदस्त प्रहार करताना म्हणाल्या की भाजप नेतृत्वाकडे आता बोलण्यासाठी काहीच उरले नाही. त्यामुळे आता त्यांची वाटचाल ही दडपशाही कडे चालली आहे. ज्येष्ठ नेते पवार साहेब यांच्यावर टीका केल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नाही त्यांनी भाजप पक्षाला वाढविले. संघटन मजबूत केले ते ज्येष्ठ कार्यकर्ते आता कुठे आहेत असा सवाल देखील त्यांनी यावेळी भाजप पक्षाच्या नेतृत्वावर केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजप पक्षात गेलेल्या नेत्यांचा देखील त्यांनी चांगला समाचार घेतला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.