Vinayak Nimhan : शिवाजीनगर चे माजी आमदार विनायक निम्हण यांचे दुःखद निधन

शिवसेना पक्षाचे शिवाजीनगर मतदार संघाचे माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे त्यातच निधन झाले आहे.
शिवाजीनगर मतदार संघातून १९९९ साली विनायक निम्हण हे प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळेस त्यांचा राजकीय प्रवास हा शिवसेना विभाग प्रमुख तसेच पुणे शहर प्रमुख असा होता. ते दोन वेळा शिवसेना पक्षाच्या वतीने आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी नारायण राणे यांच्याबरोबर काँग्रेस पक्षात प्रवेश करून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर ते आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षात प्रवेश केला. व शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. हो पुन्हा एकदा पुणे शहर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. ते काम त्यांनी आजतागायत ते शिवसेना पक्षात होते. त्यांची खरी नाळ ही शिवसेनेचीच होती. शिवसेनेचे कसब्यातील ज्येष्ठ नेते नंदू घाटे यांची कन्या स्वाती यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांचे चिरंजीव सनी निम्हण यांनी भाजप पक्षात प्रवेश केला.
सुरुवातीच्या काला खंडात विनायक निम्हण यांनी शिवसेनेत ग्राउंड लेव्हलवर काम करून त्यांनी आपला कामकाजाच्या माध्यमातून ठसा उमटविला. शिवसेना पक्षासाठी त्यांनी स्वतःला पूर्ण वेळ देऊन शिवसेना पक्ष हा त्यांच्या मतदारसंघांमध्ये चांगले काम करून जन माणसाच्या हृदयात चांगले स्थान मिळविले होते. त्यावेळेस त्यांच्याबरोबर शिवसेना मतदारसंघाचे माजी आमदार शशिकांत सुतार यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. आज कुटुंबासमवे त पाडवा हा सण साजरा करत असताना अचानकपणे त्यांना छाती मध्ये वेदना झाल्याने त्यातच त्यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी माजी नगरसेविका स्वाती निम्हण. मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण. दोन मुली दोन भाऊ एक सून जावई नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज पाषाण येथील स्मशानभूमीत रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.