गोवा मुक्तीच्या सत्याग्रहात घेतला होता सहभाग : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुखःद निधन झाले.

पुणे दिनांक २७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव ढाकणे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे.मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते.काल रात्री त्यांना ह्ृदयविकाराचा झटका आला व त्यांच्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गोवा मुक्ती संग्रामात त्यांनी सहभाग घेतला होता.त्यांनी महाराष्ट्रात अनेक खात्याचे मंत्रीिपद भुषविले.व तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ते ऊर्जामंत्री होते.
दरम्यान जेष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या निधनाची वार्ता राजकीय क्षेत्रात सर्वांसाठी दुखःदायक आहे.ढाकणे कुंटूंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो .हीच ईश्वरचरणी प्रार्थना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.तसेच बाजार समितीपासून त्यांनी आपले राजकारण सुरू केले.संघर्षशील.सर्वसामान्यांचे प्रामाणिक नेतृत्व बबनराव ढाकणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली,असे ते म्हणाले.दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ढाकणे यांना श्रद्धांजली वाहिली तसेच आपल्या बुलंद आवाजाच्या माध्यमातून शेतकरी.कामगार . मजूर वर्गाच्या हिताच्या मागण्यांसाठी सरकार दरबारी पोहोचवण्याचे काम ढाकणे यांनी केले.त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो असे ते म्हणाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.