१ हजार ५०० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त : जालन्यात आज ओबीसीची महासभा.जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश

पुणे दिनांक १७ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी पसून २० किलोमीटर अंतरावर अंबड येथे आज सकल ओबीसी समाजाच्या वतीने एल्गार सभा होणार आहे.मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत.व संपूर्ण महाराष्ट्रात आता मराठा कुणबी अशा नोंदी मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने ओबीसी समाजाच्या पाया खालची वाळू सरकायला लागल्या मुळे आता ओबीसीचे नेते जागृत झाले आहे.व त्यांनी आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ओबीसी मधून विरोध केला आहे.यासभेचे आयोजन करण्यात आले आहे.यासभेत मंत्री छगन भुजबळ.पंकाजा मुंडे.विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार.महादेव जानकर.गोपीचंद पडवळकर प्रकाश शेंडगे.यावेळी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान जालना जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश जिल्हा धिकारी यांनी दिले आहेत.जिल्ह्यात आज अंबड येथे ओबीसी समाजाची एल्गार सभा होणार आहेत.व विविध भागात अनेक कार्यक्रम होणार आहेत.दरम्यान आजची ओबीसी समाजाची एल्गार सभा ही अंतरवली सराटी पासून फक्त २० किलोमीटर अंबड येथे होत आहे.या सर्व पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश दिले आहेत.त्यामुळे कोणत्याही परवानगी न घेता पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सभा घेण्यास व मोर्चा काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.हे जमावबंदीचे आदेश ३० नोव्हेंबर पर्यंत अंमलात राहतील.असे जिल्ह्यधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.