Panchayat samiti chairman election : नागपुरात होम पिचवर फडणवीस व बावनकुळे यांना काँग्रेसचा दे धक्का, पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपाची पीछेहाट?

महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला चांगलाच झटका बसला आहे . नुकत्याच झालेल्या व ' मिनी विधानसभा ' समजल्या जाणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी पक्षाने जोरदारपणे आघाडी घेत भाजपला चारी मुंड्या चित्त केले आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण १३ तालुक्यातील पंचायत समितीत सभापती पदाची एकही जागा भाजप पक्षाला जिंकता आली नाही. आणि देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी त्यांच्या होम पिचवरच त्यांच्यासाठी त्यांना हा सर्वात मोठा धक्का असल्याची चर्चास आता राजकीय वर्तुळात सगळीकडे पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडी सरकार मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फूट पाडून सत्तांतर घडून आणले खरे. पण भाजपाचे होमपीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात शनिवारी झालेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडीत काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी पक्षाने चांगलेच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारला चारी मुंड्या चित्त करीत विजय पटकावला आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने मोठी आघाडी घेत एकूण नऊ जागेवर तर राष्ट्रवादी राष्ट्रवादी पक्षाने तीन जागांवर विजय मिळविला आहे मात्र एकनाथ शिंदे गटाला फक्त एक रामटेक तालुक्यात जागा मिळाली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये तालुका निहाय कामठी सावनेर कळमेश्वर पारशिवनी उमरेड मौदा कुही भिवा यात काँग्रेस पक्षाचा विजय झाला आहे. यातील फक्त रामटेक कोई व मौदा मध्ये भाजपाला उपसभापती पद मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख. यांच्या विधानसभा क्षेत्रात काटेल व व नरखेड या ठिकाणी सभापती पद राष्ट्रवादी तसेच हिंगणा येथे ही सभापतीपद राष्ट्रवादी आशा तीन जागा आपल्या ताब्यात घेतले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.