मुख्यमंत्र्यांनी काल केल्या बदल्या : महाराष्ट्रातील पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या दिवाळीतच तडकाफडकी बदल्या

पुणे दिनांक १४ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र राज्यातील एकूण पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या दिवाळीतच सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.त्यामुळे भर दिवाळीच्या तोंडावरच ह्या बदल्या तडकाफडकी झाल्यांने अनेक आयएएस अधिकारी यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. यातील बदलीचे आदेश देखील तातडीने कालच त्यांना दिले आहेत.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार. महाराष्ट्रातील विविध विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या आयएएस अधिकारी यांचा समावेश आहे. १)आशीश शर्मा २) प्रवीण पुरी ३) दीपक तावरे ४) विकास पानसरे ५) अमन मित्तल व यात उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आयएएस आशीश शर्मा यांचा देखील समावेश आहे.त्यांची मुंबईतील राज्य कर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व आयएएस अधिकारी यांच्या बदलीचे तडकाफडकी बदली करुन आदेश देखील त्यांना दिले आहेत.परंतू एकदम दिवाळीच्या कालावधीत ह्या सर्व अधिकारी यांच्या तातडीने बदली करण्यात आल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.