Rahul Gandhi : राहुल गांधींना हाई अलर्ट

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या अंतिम टप्यावर आहे. ही यात्रा 19 जानेवारीला जम्मू-काश्मीरला पोहोचणार आहे. यात्रा काश्मीरला जाण्याआधीच सुरक्षा यंत्रणांनी राहुल गांधी यांना अलर्ट जारी केला आहे. काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी पायी चालू नये, असा सल्ला सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सुरक्षा यंत्रणांनी राहुल गांधींची यांची सुरक्षा लक्षात घेत एक विस्तृत योजना तयार केली आहे. या योजनेनुसार राहुल गांधी यांनी चालत पदयात्रा करण्यापेक्षा वाहनांचा वापर करून यात्रा पूर्ण करावी, अशी सूचना देण्यात आली आहे.
भारत जोडो यात्रा 19 जानेवारीला जम्मू-काश्मीरला पोहोचणार आहे. 25 जानेवारी रोजी राष्ट्रध्वज फडकवून ते बनिहालमध्ये प्रवेश करतील. तर, 27 जानेवारी रोजी अनंतनागमार्गे श्रीनगरमध्ये प्रवेश करतील. श्रीनगरमध्ये असताना राहुल गांधींसोबत फक्त मोजक्या लोकांनी प्रवास करावा, असा सल्ला सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. तसेच तसेच, फक्त ओळखीच्या लोकांनाच सोबत ठेवावे असा सल्लाही सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.