Politiks : काका -पुतण्याच्या गुप्त भेटीनंतर काॅग्रेस 'अलर्ट' मोडवर ' हायकमांड'चं लक्ष

पुणे दिनांक १४ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) दरम्यान पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटी नंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.भेटीनंतर शरद पवार यांनी देखील याबाबत खुलासा केला आहे."अजित पवार हे माझे पुतणे असून कुंटूंबा मधील व्यक्तिने भेटण्यात गैर काय?.अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.मात्र एकंदरीत ठाकरेगट व काॅग्रेस या प्रकरणी ' अलर्ट ' झाली आहे.
दरम्यान काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकीय घडामोडी बाबत राहुल गांधी यांच्या बरोबर चर्चा करून शरद पवार -अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीबद्दल त्यांना या बाबतीत माहिती दिली आहे.त्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी बाबत काॅग्रेस हायकंमांड देखील लक्ष ठेवून आहेत.असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.दरम्यान " काका-पुतण्या यांच्या मधील गुप्त भेटीनंतर आता जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे असलेतरी भेटीनंतर गाडीत झोपून जाणे व गुप्त पणे बैठका घेणे हे सर्व आघाडी साठी चिंताजनक आहे." असे नाना पटोले हे माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.मुंबई मध्ये होणाऱ्या 'इंडिया' घ्या बैठकीत काॅग्रेस हायकंमांड व शरद पवार यांच्यात याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यसभा खासदार संजय राऊत यांनीही माध्यमांशी बोलताना अजित पवार -शरद पवार यांच्या मधील गुप्त भेटी संदर्भात सूचक विधान करत " शरद पवार यांच्या भूमिका बाबतचा संभ्रम फार काळ राहता कामा नये, याबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून काही निर्णय घेणं आवश्यक आहे." असं म्हटले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.