निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काका व पुतण्याच्या दोन्ही वकिलांच्या वतीने आक्रमक युक्तिवाद : ' अजित पवार गटाच्या सोबत किती आमदार? फक्त आकडा नको तर नावं सांगा; शरद पवार यांच्या वकिलांचा युक्तिवाद

पुणे दिनांक ९ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष चिन्हाच्यां वादावर निवडणूक आयोगात आज दुसऱ्यांदा सोमवारी सुनावणी झाली. यावेळी दोन्ही गटाकडून आक्रमक युक्तिवाद करण्यात आला आहे.अजित पवार गटाकडून अॅड नीरज किशन कौल व मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला.तर शरद पवार गटाच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला आहे.
दरम्यान यावेळी अजित पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगात दिलेल्या उत्तरात बहुसंख्य आमदार आमच्या सोबत असल्याचा दावा करण्यात आला.त्यामुळे त्यांच्या सहमतीने राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी झाला असल्याचेही अजित पवार गटाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.या युक्तिवादावर शरद पवार यांच्या गटाच्या वतीने बाजू मांडताना वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले अजित पवार गटा बरोबर किती आमदार आहेत.हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, अजित पवार यांच्या बरोबर नेमके किती आमदार आहेत? असे म्हणत आमदारांचा फक्त आकडाच नाही तर. नावे देखील सांगा, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला.
दरम्यान अजित पवार गटाने असा युक्तिवाद केला " राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंत्रर्गत लोकशाहीच्या अभाव आहे.पक्षावर कोणताही एक व्यक्ती दावा करु शकत नाही.सध्या पक्षात अशीच परिस्थिती आहे. शरद पवार हे घरा प्रमाणे पक्ष चालवत होते," असा युक्तिवाद करण्यात आला आहे." आमच्या कडे दिड लाखावरुन जास्त शपथपत्र असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे आमच्या सोबत आहे.व प्रफुल्ल पटेल यांच्या सहीनेच नविन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत." असा दावा देखील अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आला आहे.
दरम्यान अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात शिवसेनेच्या केसचा दाखला देण्यात आला.तसेच अजित पवार यांची निवड योग्य असून शरद पवार यांनी सर्व नियम पायदळी तुडवले, असा युक्तिवाद अजित पवार यांच्या गटाच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान आज झालेल्या युक्तिवादात ३० ऑक्टोबर प्रर्यत शरद पवार गटाला कागदपत्रे जमा करण्याबाबत निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.पुढील सुनावणी ही ९ नोव्हेंबरला होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.