बीड मधील घटना. : मराठा समाज आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन आक्रमक बीड मध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम पाडला बंद

पुणे दिनांक २७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाचा आरक्षण प्ररकणीचा मुद्दा आता ठराविक जिल्ह्या पुरता मर्यादित राहिलेला नसून त्याचे लोण आता संपूर्ण महाराष्ट्रात पोहचले आहेत.अनेक गावात तालुक्यात जिल्ह्यात मराठा समाजाचे लहानांपासून ते तरुण वयोवृद्ध व महिला पुरुष यांनी हाती घेतला आहे.
दरम्यान अनेक गावांत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.व तसे भल्ले मोठे होर्डिंग्ज गावाच्या वेशीवर लावले आहेत.याताच आज बीडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता.मात्र सदरचा कार्यक्रम हा संतप्त झालेल्या मराठा आंदोलंकानी बंद पाडल्याची माहिती मिळत आहे.आरक्षण नाही तोपर्यंत सरकारचा कुठलाही कार्यक्रम होऊ देणार नाही.असे मराठा समाजाच्या आंदोलंकानी म्हटले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.