आरोग्यमंत्र्यांवर मराठा समाज नाराज.साखर नको आरक्षण द्या : धाराशिव मध्ये मराठा समाजाचे बांधव आक्रमक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या साखरेची केली होळी

पुणे दिनांक १३ नोव्हेंबर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यात सध्या मराठा आरक्षणा वरुन वातावरण चांगलेच तापले आहे.मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ नोव्हेंबर हा अंतिम तारीख दिली आहे.दरम्यान मध्यंतरी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मनोज जरांगे पाटील व मराठा समाजा बदल वादग्रस्त वक्तव्य केले होते की मागील दोन वर्षात हे लोक झोपले होते का त्या वरुन मराठा समाज त्यांच्यावर नाराज आहेत.यातच त्यांनी दिवाळी निमित्त साखर वाटप केली होती.या साखरेची मराठा समाजाच्या बांधवांनी होळी केली आहे.
दरम्यान धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदार संघातील सावरगावात साखर वाटप दिवाळी निमित्त केली होती.पण येथे मराठा समाजाच्या बांधवांच्या रोशाला आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना सामोरे जावा लागले.संतप्त झालेल्या मराठा बांधवांनी रस्त्यावर साखर आतून होळी केली आहे. यावेळी निषेध करुन साखर नको.आरक्षण द्या असे म्हणत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या आहेत.त्या मुळे आता या आरक्षणाची मोठी झळ आता संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील नेते मंडळी यांना बसणार आहे.व १५ नोव्हेंबरला मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची मोठी सभा ही परांडा येथे होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.