येवला मतदार संघात मराठा समाज आक्रमक सकल मराठा समाजांचे होणार उपोषण : अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात प्रत्येक मोठ्या गावात मराठा समाज करणार उपोषण

पुणे दिनांक २५ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) छगन भुजबळांच्या येवला मतदार संघात सकल मराठा समाजाच्या वतीने झालेल्या बैठकीत आरक्षणांच्या प्रश्र्नांवर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून.दरम्यान आरक्षण संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या वेळेत मराठा समाजाला दिलेल्या वेळेत आरक्षण न दिल्यामुळे मराठा समाजाच्या तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर प्रचंड असा असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे सरकार मधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघातील सर्वच मोठ्या गावात साखळी उपोषण करणार आहेत.
दरम्यान आता राज्य सरकारला तब्बल ४० दिवस देउन सुध्दा हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणा बाबत संवेदनशील दिसत नसल्याने व सरकारला दिलेला ४० दिवसांचा कालावधी संपल्या नंतर आता मराठा समाज आक्रमक झाला असून आता या प्रश्र्ना संदर्भात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व नेत्यांना गावबंदी करण्यात येणार आहे.व याभागातील प्रत्येक मोठ्या गावात साखळी उपोषण करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.व या येवला मतदार संघात ठिक ठिकाणी उपोषण व नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्धार घेण्यात आला आहे.आता याबाबत पुढील रणनीती ठरविण्यात आली आहे.यात अंतर्गत मतभेद.पक्ष. पद या सर्व गोष्टी बाजूला ठेवून सर्व समाज बांधव एकत्र येऊन मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांनीं दिलेल्या नियोजणा नुसार आंदोलन उभे करण्यात येइल असा ठराव सकल समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.