Politiks : विरोधकांच्या INDIA ची पुढची बैठक. मुंबईत उध्दव ठाकरे नेतृत्व करणार

पुणे दिनांक १८जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) भारतीय जनता पार्टीला सत्तेतून घालवण्यासाठी विरोधी ऐक्याची पुढची तिसरी बैठक महाराष्ट्राची राजधानी मुंबईत होणार आहे. या बैठकीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना ' मेसेज ' देण्यांचा डावच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी टाकला आहे. व ही बैठक बोलवतानाच भारतीय जनता पार्टीला घाबरू नका.असा शब्द देखील ठाकरे यांनी विरोधी व्यासपीठावर दिला सर्व पक्षीय विरोधकांना मुंबईत आणून ठाकरे एक प्रकारे भाजपला शिवसेना आपली ताकद दाखवून देणार आता हे उडड झाले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला शह देण्यासाठी बंगळुरू येथे आज विरोधीपक्षाचे नेते मंडळी यांची दुसरी बैठक पार पडली . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार. उध्दव ठाकरे. आदित्य ठाकरे. व राज्यातील काँग्रेस पक्षांचे नेते सदरच्या बैठकी मध्ये उपस्थित होते. या बैठकीत भारतीय जनता पार्टी विरोधक एकूण २६ पक्षांनी आपला सहभाग नोंदवला होता. या बैठकी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे यांनी एक प्रकारे भाजपला चांगलेच आव्हान दिले आहे.
या वेळी उध्दव ठाकरे म्हणाले " आज हुकूमशाही विरोधात देशातील जनता एकत्रित येत आहे. या भारतासाठी आम्ही लढणार आहेत. त्या साठी आम्ही सर्व एकत्र आलो आहे .राजकारण वेगवेगळ्या विचारधारेचे लोक आहेत आणी यालाचतर लोकशाही म्हणतात .काही लोकांना वाटतंय की आम्ही कुटुंबासाठी लढत आहेत. पण पण ही लढाई कुटुंबांची नाही व पक्षांची नाही. हा देश आमचे कुंटूब आहे. व या कुंटूबा साठी आम्ही लढत आहोत.
पुढे ते म्हणाले " आमची लढाई ही एका पक्षाच्या किंवा एका व्यक्तीच्या विरोधात नाही .आमची लढाई ही विचार धारा व हुकूमशाहीच्या विरोधात आहे. एकेकाळी जशी स्वातंत्र्यासाठी लढाई झाली होती. पण आता हे स्वातंत्र्यच धोक्यात आले आहे. त्या साठी आम्ही पुन्हा एकत्र आलो आहोत. आणि मला विश्वास आहे. कि ही लढाई आम्ही नक्कीच जिंकू असे ठाकरे म्हणाले. लोंकाना भिती वाटतेय की आता काय होणार. पण मला लोकांना विश्वास द्यायचा आहे घाबरू नये.आम्ही आहोत घाबरु नका .एक पक्ष एक देश होऊ शकत नाही "असे देखील उध्दव ठाकरे म्हणाले. या पुढची तिसरी बैठक आपण मुंबईत घेऊ असे सांगत राहूल गांधी. व खरगे यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षांना मुंबई बैठकीचे आमंत्रण दिलं.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.