सिध्दीविनायक न्यासाच्या अध्यक्ष पदाचा वाद : गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूकीतून गोळीबार करणारे सिध्दीविनायक न्यासाचे अध्यक्ष शोभतात का? शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरेंचा घणाघात

पुणे दिनांक ७नोव्होंभर (पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ज्यांनी गोळीबार केला.त्यांची चौकशी न करता त्यांना सिद्धीविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले.हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपच्या गॅगच्या गद्दाराचं हे कोणत हिंदूत्व आहे.असा रोखठोक सवाल शिवसेना उध्वव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान सिध्दीविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या नंतर आदित्य ठाकरे यांनी या नियुक्ती बाबत टिका केली आहे.दरम्यान एक्स या समाज माध्यामांवर पोस्ट लिहून आदित्य ठाकरे यांनी टिका केली आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत शिवसेना आमदारांनी बंदुक रोखून गोळीबार केला होता.त्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व भाजप सरकारने त्यांना सिध्दीविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी म्हणून बसवले अशी टीका त्यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.