Politiks : शपथविधी होऊन एक आठवडा झाला पण राष्ट्रवादी चे नऊ मंत्री बीन खात्याचे मंत्री

पुणे दिनांक ९जुलै ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) २ जुलै रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्याच्या बरोबर अन्य आठ आमदारांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. शपथ घेऊन आज बरोबर आठवडा होत आहे. तरी त्यांना अजून खाते वाटप झाले नाही. ते बीन खात्याचे मंत्री म्हणून त्याच्या मतदार संघात फिरत आहे. काल छगन भुजबळ त्यांच्या मतदार संघात गेले. तर आज दिलीप वळसे पाटील हे त्यांच्या आंबेगाव मतदार संघात गेले आहेत. व १७.जुलै पसून अधिवेशन पण चालू होत आहे अधिवेशनात हे मंत्री बीन खात्याचे मंत्री म्हणून बसणार हा एक मोठा प्रश्नच आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आसली तरी दिल्ली हेड क्वाॅटर वरून अधिकृत आदेश जो पर्यंत येत नाही. तो पर्यंत या आमदारांचे खाते वाटप होणार नाही. व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील पण काही आमदारांचे शपथ विधी व रखडलेल्या आहेत.त्या मुळे एकाच वेळी पण शपथ विधी व खात्याचे वाटप होऊ शकते. असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान १७ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशनसुरू होणार आहे. या कालावधीच्या आधी मंत्री मंडळाचा विस्तार होऊ शकतो. अजित पवार हे सरकार मध्ये दाखल झाल्या मुळे आता राजकरणातील समीकरणे देखील बदलले आहेत.आता मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्यातील आमदारांची आधीच चढावढ होती पण आता त्यांच्यात तिसरा भिडू म्हणजे राष्ट्रवादी देखील आली आहे. त्या मुळे शिंदे गटातील आमदारा मध्ये नाराजी आहे. व आता भाजपच्या काही मंत्र्यांना आपली मंत्री पदे सोडावी लागणार लागणार आहे. अशी दबक्या आवाजात ही चर्चा असल्याची समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना कोणती खाती देयाची हे दिल्ली तील वरिष्ठ नेते आदेश देणार आहेत. अशी माहीती सुत्रांन कडून कळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.