सरकार हायमोडवर : जरांगे पाटील यांच्या ' दणक्याने ' सरकार झाले सतर्क.मुख्यमंत्र्यांनी बोलावली आमदार -खासदार यांची तातडीने बैठक

पुणे दिनांक ३ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटीत काल उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज्य सरकारच्या शिष्ठटमंडळाची चर्चा झाल्या नंतर जरांगे पाटील यांनी सरकारला फक्त २३ डिसेंबरची हेडलाईन दिल्याने सरकार चांगलेच सतर्क झाले असून.आज काही वेळापूर्वी महाराष्ट्रातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची दुरदृश्यप्रणालीद्वारे बैठक पार पडली आणि आता लगेच सर्व आमदार व खासदार यांची तातडीने बैठक बोलावली आहे.
दरम्यान काल अंतरवली सराटीत जरांगे पाटील यांच्या बरोबर राज्य सरकारच्या शिष्ठटमंडळाची चर्चा झाल्यानंतर आता सरकारकडे फक्त २३ डिसेंबर ही डेडलाइन आहे.त्यामुळे सरकार आता चांगलेच ऑक्शन मोडवर आले आहे.मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आमदार व खासदार यांची बैठक बोलावली आहे.सदरच्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करणार आहेत.दरम्यान आता सरकार समोर मराठा आरक्षण.व धनगर आरक्षणांची मागणी आहे.यासर्व पार्श्वभूमीवर व अन्य काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठकीत चर्चा होणार आहे.सदर बैठकीत तीनही पक्षाचे आमदार - खासदार हे उपस्थित आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.