Chandrakant patil : कोथरूड चे ' दादा ' आमदार चंद्रकांत पाटीलच विजयावर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्का मोर्तब

नुकत्याच स न .२०१९. मध्ये झालेल्या म्हणजेच अडीच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत. चंद्रकांत पाटील यांच्या विजयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब झाल्याने. आता कोथरूड चे ' दादा ' म्हणजेच चंद्रकांत पाटील आमदार असणार आहेत. नव्यानेच त्यांची पुण्याच्या पालकमंत्री पदी निवड झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ऍड किशोर शिंदे यांची याचिका फेटाळून लावली आहे.
२०१९ साली झालेल्या महाराष्ट्रातील सर्वात्रिक निवडणुका झाल्या त्यात कोथरूड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी निर्विवाद पणे विजय मिळविला होता. परंतु या विधानसभा निवडणुकीच्या निकालाला ऍड किशोर शिंदे यांनी माननीय उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर उच्च न्यायालयाने ऍड शिंदे यांची याचिका फेटाळून लावून पाटील यांच्या विजयावर शिक्का मोर्तब केलें आहे.
नंतर उच्च न्यायालयाचा निकालाला ऍड शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली होती. माननीय सर्वोच्च न्यायालयाने मात्र ऍड शिंदे यांची याचिका फेटाळून लावत पाटील यांच्या विजयावरच शिक्कामोर्तब केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने सर्वत्र पाटील यांचे स्वागत केले आहे. व शेवटी विजय सत्तेचा झाला असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.