लातूर आता पुणेनगरीला झाले कनेक्ट : आज पासून लातूर ते पुणे इंटरसिटी एक्सप्रेस सुरू लातूरकरांची प्रतिक्षा संपली

पुणे दिनांक १० ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) दळणवळण साठी लातूर ते विद्याचे माहेरघर पुण्याला या दोन शहरांना जोडणारी इंटरसिटी एक्सप्रेस ट्रेन आज दिनांक १० ऑक्टोबर मंगळवार पासून सुरू झाली आहे.या रेल्वे एक्सप्रेसचे लातूर येथील हरंगुळ रेल्वे स्टेशनवर प्रवासी यांनी जोरदार स्वागत केले.यावेळी लातूरचे खासदार सुधाकर शिंगारे इतर मान्यवरांसह सर्व लातूरकर उपस्थित होते.आज खासदार शिंगारे यांच्या हस्ते ट्रेन च्या इंजिनला श्रीफळ वाढवून व हार घालून ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला व नंतर ही एक्सप्रेस पुण्याच्या दिशेला रवाना झाली.
दरम्यान पुणे ते लातूर इंटरसिटी एक्सप्रेस दररोज पुणे रेल्वे जंक्शन येथून सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सुटेल व लातूर येथील हरंगुळ रेल्वे स्टेशनवर दुपारी १२ वाजून ३० मिनिंटांनी पोहचेल दररोज दुपारी ३ वाजता लातूर येथील हरंगुळ रेल्वे स्टेशनवरून सुटेल व पुणे जंक्शनवर रात्री नऊ वाजता पोहोचेल.सदरची ट्रेन सुरु करण्या बाबत लातूरकरांनी खासदार सुधाकर शिंगारे यांच्याकडे मागणी केली होती.व याबाबत खासदार यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा केला व त्यांच्या प्रयत्नांना यश आले.व आजपासून ही ट्रेन सुरु झाली याचा आनंद सर्व लातूरकरांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.व लातूरकरांनी शिंगारे यांचा क्रेनच्या सह्हयाने हार घालून यावेळी भव्य असा सत्कार करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.