Politiks : पुणे मधील लाचखोर महसूल विभागातील आय ए एस अनिल रामोड प्रकरणात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विखे पाटील यांच्यावर फोडला ' लेटर बाॅमब '

पुणे.दिनांक २५.( पोलखोल नामा ऑनलाईन न्यूज टीम ) महाराष्ट्र राज्यचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक ' लेटर बॉम्ब ' टाकत एकच खळबळ उडवून दिली आहे. या लेटर बाॅम्ब मध्ये पुणे विभागातील महसूलचे आय ए एस लाचखोर डाॅ.अनिल रामोड यांना महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीच त्यांना पुण्यात एक वर्षा साठी मुदत वाढ द्यावी असे शिफारस पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहीले होते. आणी तेच पत्र दानवे यांनी ट्विट केले आहे आता या सर्व प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री व राज्य सरकार काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान मागील काही दिवसां पूर्वी सोलापूर जिल्ह्य़ातील महामार्गावरील जमिनीचे भूसंपादन बाबत योग्य मोबदला मिळवून देण्याच्या आमिषा पोटी ८.लाख रूपयांची लाच घेतल्याने अटकेत असलेले व सी.बी आय च्या शिफारशीनुसार नुकतेच त्यांना राज्य सरकार ने निलंबित केलेले पुण्यातील महसूल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त डाॅ.अनिल रामोड. प्रकरणात आता नव्याने माहिती आली आहे.राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिफारस पत्र लिहीले होते.
हेच पत्र ट्विट करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विखे पाटलांवर ' लेटर बाॅम्ब ' फोडला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेले ते पत्रच समोर आणत अंबादास दानवे यांनी म्हणले आहे की ' व्वा रे व्वा विखे पाटील ! पुणे येथे आय ए एस अधिकारी डाॅ.अनिल रामोड यांना ८.लाख रूपायांची लाच घेताना सी बी आय ने अटक केल्या मुळे ते सध्या कारागृहात आहेत. पण या आधी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव पुढे आले आहे. या मंत्र्यांणीच रामोड यांची बदली पुण्यावरून करू नये. या साठी खास पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. व रामोड यांना एक वर्ष मुदत वाढ द्यावी. या साठी त्यानी शिफारस केली होती. सदरचे पत्र हे १जून रोजी लिहिले होते. असा दावा करणारा ' लेटर बाॅम्ब ' अंबादास दानवे यांनी विखे पावलांवर फोडून त्यांच्यावर फोडून हल्लाबोल केला आहे. या सर्व घडामोडी नंतर महसूल मंत्री व राज्य सरकार काय उत्तर देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.