गणेशोत्सवात या लेझर लाईटने अनेकांना डोळ्यांचा मोठा विकार : डीजे व लेझर LED लाईट्सवर निर्बंध घालण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे दिनांक १० ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात डआॅल्बईव लेझर प्रकाशझोत व एलईडीमुळे नागरिकांना डोळ्यांचा प्रचंड त्रास झाला आहे.गणेशोत्सवात काही नागरिकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काहींना आपले डोळे गमवावे लागले आहेत.या सर्व पार्श्वभूमीवर काॅग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रात या लेझर लाईट व डाॅल्बीवर तातडीने निर्बंध आणण्यांची मागणी या पत्राद्वारे केली आहे.
दरम्यान या डाॅल्बीच्या आवाजाने पुण्यातील हिंजवडी भागात राहणाऱ्या योगेश अभिमन्यू साखरे याचा मृत्यू झाला तर सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे राहणाऱ्या शेखर सुखदेव पावशे या युवकांचा डाॅल्बीच्या आवाजाने ह्रदय विकार येवून मृत्यू झाला आहे. तर वाळवा तालुक्यातील दुधारी येथील प्रविण शिरतोडे यांचा मृत्यू देखील डाॅल्बीच्या आवाजाने मृत्यू झाला आहे.तर गणेशोत्सव मिर्वणूक दरम्यान विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या गणेश भक्तांना लेझर लाईटच्या किरणस्तव मुळे व एलईडी लाईट मुळे काहीना कायमचेच अंध्त्व आले आहे.तरी राज्य सरकारने या बाबत कठोर पावले उचलावीत व यांवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.