इंडिया आघाडीचा धसका : INDIA आघाडीच्या दोनच बैठका सिलेंडरच्या किंमती २०० रूपयांनी कमी ममता बॅनर्जी?

पुणे दिनांक २९ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज केंद्र सरकारच्या वतीने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती२०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांसंदर्भात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत . इंडिया आघाडीच्या बैठकीचा धसका घेतल्याने केंद्राने गॅसच्या किंमती कमी केल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.केवळ विरोधी गटाच्या दोन बैठका व गॅस सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी...असे ममता बॅनर्जी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान तुणमूल काॅग्रेस पक्षाच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की.आताप्रर्यत इंडिया आघाडीच्या फक्त दोनच बैठका झाल्या आहेत.पण सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी घटवाण्याचा निर्णय घेतला.हाच आहे INDIA चा दम. या ममता बॅनर्जी यांच्या ट्विट नंतर यांची ही पोस्ट आम आदमी पार्टीचे ( आप) घ्या राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही शेअर केली आहे.राखी पोौर्णिमा पासून देशभरातील घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी केल्या जातील मोदी सरकारच्या देशभरातील महिलांना राखी पौर्णिमेची भेट दिल्याचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज जाहीर केले होते.त्यावरुन आता ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.