Politiks : मन की बात बंद करो,मणिपूर की बात करो ; ' गो बॅक क्राईम मिनिस्टर ' पुण्यात झळकले बॅनर्स

पुणे दिनांक ३१ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मोदींच्या पुणे दौ-याआधीच विरोधी पक्ष आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. युवक काँग्रेसच्या वतीने पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौ-यावर येत आहे. पुण्यात आल्यावर त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचे उदूघाटन होणार आहे. मात्र त्यांच्या पुणे दौ-या आधीच विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करणारे बॅनर्स लावण्यात आले आहे.
" मन की बात बंद करो मणिपूर की बात करो " आशयाचे मजकूर लावलेल्या बॅनर्स वर दिसून येत आहे. या शिवाय 'गो बॅक क्राईम मिनिस्टर 'असा मजकूर सुध्दा या बॅनर्स वर दिसून येत आहे . दरम्यान मोदी यांच्या दौ-या आधीच युवक काँग्रेसने पुणे शहरात लावलेले हे बॅनर्स हा आता एक चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान देशांमध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. व मणिपूरच्या चर्चेवरून या अधिवेशनात सर्व विरोधकांनी मिळून एकच गदारोळ दोन्ही सदनात घातला आहे. व मणिपूराच्या हिंसाचाराच्या प्रश्नांन वरून सर्व विरोधक आक्रमक झाले असतांनाच पंतप्रधान पुणे दौ-यावर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोंदीना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुणे दौ-यावर येत आहेत .हा दौरा महत्त्वाचा असण्याचे कारण म्हणजे पुरस्कार समारंभाच्या या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.
या मुळे या दौ-यावर सर्व विरोधकांचे व संपूर्ण देशांचे लक्ष लागले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शरद पवार प्रथमच एका व्यासपीठावर दिसतील .दरम्यान शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात आहे.त्या मुळे आता काय होणार हे पाहणं औस्तुक्यांचे ठरणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.