गिरीश महाजन यांना देखील जरांगे पाटील यांचा टोला ' दगा फटका केल्यास सरकारला सोईचे जाणार नाही ' : माढ्यातील अजित पवार यांच्या ' त्या ' वक्तव्यावरून मनोज जरांगे पाटील म्हणाले...' आता आमच्या घरांवर नांगर फिरवता का?

पुणे दिनांक २३ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माढ्यात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर एक वक्तव्य केले की जरांगे पाटील यांच्या सभेला कुणबी प्रमाणपत्र मिळालेले नागरिक हे पण का जातात व मरठा समाजामध्ये थांबण्याची मानसिकता नाही? असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय त्यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला आहे." आता आमच्या🏠 घरावर नांगर फिरवता का? अजित पवार यांनी आमच्यात फूट पडायचं ठरवलं आहे काय? आम्ही भाऊ- भाऊ आहोत आणि आम्ही येणारच.तुमची जी भावना आहे.ती त्यांची नाही.त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे.तुम्ही यांच्या साठी बाहेर पडले काय? एवढे दिवस तर मराठा आंदोलनावर बोलले नाही" अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सुनावलं.
दरम्यान पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले " तुम्हाला सरकारने यासाठी पुढे घातलं आहे काय? आम्ही भाऊ- भाऊ आहोत. आमच्यातील एकी तुम्हाला बघवत नाही का? तुम्हाला यायचं नाही आता मिठाचे खडे टाकता का? आमच्या तोंडात घास येत असताना त्यामध्ये माती कालवता का? लोक येऊन पाठबळ देत आहेत व गरीब मराठ्यांचे कल्याण व्होईल,तर तुमचं पोट का दुखत आहे?" असे एक नाही तर अनेक प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना उद्देशून उपस्थित केले आहेत.
दरम्यान अजित पवार यांच्या नंतर राज्य सरकार मधील भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी चांगलीच तोफ डागली आहे." मंत्री गिरीश महाजन महाशय आम्ही हातघाई केली नाही.तुम्हीच म्हणाला होता.चार दिवसांत होत नाही एक महिना द्या.आम्ही तुम्हाला ४० दिवस दिले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द मराठा समाजाने खाली पडू दिला नाही.त्यांच्या शब्दांचा मान सन्मान केला.आणी तुम्ही आता आम्हाला चाॅकलेट फेकून हाणत आहात का? असा सनसनाटी सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे.दरम्यान यावेळी पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की " मराठा समाजाशी तुम्ही दगाफटका केल्यास सोईचे जाणार नाही.असे बोलू नका.तुमचे शब्द आहेत.चार दिवसांत होणार नाही.एक महिना द्या.आम्ही तुम्हाला ४० दिवस दिले.तुम्ही दोन दिवसांत मराठा समाजाला आरक्षणात टाका.बाकीचे बहाणे आम्हाला आता सांगायचे नाहीत.दगा फटका करु नका.तुमच्या शब्दावर तुम्ही खरे भरा. महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. एकदा शब्द दिला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बदलत नाही. म्हणून प्रामाणिक रहा.मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल" असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.२५ ऑक्टोबर नंतर हे युद्ध सरकारला जड जाणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.